breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पक्षसंघटनेत ‘दहा हजार डोळे अन् वीस हजार कान’, ‘भाऊ’-‘दादां’चा केला घात

  • पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचक विधानाबाबत वाढली चिंता
  • आमदार जगताप आणि लांडगे समर्थकांत व्यक्त होतेय नाराजी

पिंपरी, (महाईन्यूज) – पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला आजपर्यंत मंत्रीपद नव्हते म्हणून बाळा भेगडे यांना मंत्रीपद देण्यात आले. संघटनेत काम करताना प्रत्येकाच्या कामाची नोंद घेतली जाते. 10 हजार डोळे पक्षाचं काम कोण करतात, हे पाहत असतात, असे सूचक विधान पुण्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरीत येऊन केले. मग, या दहा हजार डोळ्यांना आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी 2017 च्या पिंपरी-चिंचवड महापालिका आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केलेलं काम दिसले नसेल का, असा प्रश्न पिंपरी-चिंचवडकरांना पडला आहे.

  • पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पिंपरी-चिंचवड भाजपच्या वतीने शहरातील भाजप कार्यालयात सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत पाटील यांनी माहिती सांगितली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर राहूल जाधव, नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, पक्षनेते एकनाथ पवार, प्रदेशचे महेश कुलकर्णी, उमा खापरे, सरचिटणीस सारंग कामतेकर, अमोल थोरात, स्थायीच्या माजी सभापती सीमा सावळे, विधीच्या माजी सभापती माधुरी कुलकर्णी, राज्याचे खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. हेमंत तापकीर, नगरसेवक तुषार कामठे, चंद्रकांत नखाते, नगरसेविका आरती चोंधे आदी उपस्थित होते.

आमदार जगताप आणि लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. त्यांनी अडीच वर्षे कारभारही व्यवस्थितरित्या करून दाखविला. काहीजणांचा सुरवाफुगवा असला तरी वरीष्ठ पातळीपर्यंत तक्रार जाण्यासारखे भाऊ आणि दादांनी गैर काही केलेले नाही. त्यानंतर मावळ लोकसभा मतदार संघात युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचे काम जगतापांनी केले. पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातून बारणे यांना दीड लाखांहून अधिक मताधिक्य मिळवून दिले. पिंपरी-चिंचवड शहर म्हणजे भाऊ-दादा असे समिकरण असताना दोघांनी भाजपलाच मदत केली. दोघांनाही मंत्रीपदाचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. सत्तेची पाच वर्षे संपत आली तरी भाऊ आणि दादांचे काम या दहा हजार डोळ्यांना दिसले नाही. की या दहा हजार डोळ्यांना आणि वीस हजार कानांना भाऊ-दादांचा घात करायचा होता, असा संशयही व्यक्त केला जात आहे.

  • त्यातच संघनिष्ठीत भाजपचे पुण्याचे पालकमंत्री पाटील यांनी पक्ष संघटनेत काम करणा-यांची दहा हजार डोळे दखल घेत आहेत, आणि 20 हजार कान श्रवण करीत आहेत, असे सूचक विधान केल्याने पिंपरी-चिंचवडच्या पदरी पुन्हा निराशा येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या दहा हजार डोळ्यांना जर भाऊ आणि दादांनी केलेले काम दिसत नसेल तर सर्वसामान्य तळागाळात काम करणा-या कार्यकर्त्यांची काय अवस्था होईल, यावरून स्पष्ट होते. त्यातच भाजपने पिंपरी-चिंचवडला अॅड. सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, अॅड. हेमंत तापकीर आणि डॉ. अमित गोरखे यांच्या रूपाने चार राज्यमंत्री पदे दिली आहेत. विशेष बाब म्हणजे हे चारही राज्यमंत्री अपवाद वगळता संघनिष्ठीत आहेत. व्यक्तीपरत्वे भाजपमध्ये निर्णय बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळेच भाऊ आणि दादांचा नंबर लागण्याची उपेक्षा आहे. भाजपला पिंपरी-चिंचवडचे व्यक्तीकेंद्रीत राजकारण संपवायचे आहे की काय, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरून स्थानिकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button