breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

प्रियकराच्या मदतीने मुलीने केला दिव्यांग पित्याचा खून

सातारा | महाईन्युज

सातारा तालुक्यातील एका गावामध्ये प्रियकराच्या मदतीने अल्पवयीन मुलीने दिव्यांग वडिलांचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गुन्हा करणारे दोघेही अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे.

खून झालेल्या दिव्यांग इसमास एक मुलगा व मुलगी आहे. त्यांची पत्नी १५ वर्षांपासून बेपत्ता आहे. तर त्यांचा मुलगा बुधवारी बाहेरगावी गेलेला होता. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुलीने प्रियकराच्या मदतीने आपल्या वडिलाचा गळा स्कार्प आणि जर्कीनच्या लेसने आवळला होता आणि यामध्ये वडिलाचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी पोलिसांना माहिती समजली आहे. त्यानंतर गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी मृताच्या नातेवाइकाने तक्रार दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button