breaking-newsताज्या घडामोडीपुणे

प्राण्यांसाठी लोणावळा शहरात शंभर ठिकाणी अन्नपदार्थ आणि पाण्याची व्यवस्था

पुणे / महाईन्यूज

भटके श्वान, मांजरांसाठी सहज पाणी तसेच अन्नपदार्थ उपलब्ध व्हावे, या विचाराने सेस इंडिया संस्था तसेच लोणावळा नगरपरिषदेकडून शहरातील शंभर ठिकाणी कुंड उपलब्ध करण्यात आले आहेत.

भटक्या प्राण्यांना सहज दिसतील अशा पद्धतीने या कुंडांची उभारणी केली आहे. लोणावळा, खंडाळा परिसरातील नागरिकांमध्ये मुक्या प्राण्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले. राज्यसभेतील खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के, मुख्याधिकारी रवी पवार, गायक उत्तम सिंग, अभिनेत्री आयेशा जुल्का, सेस इंडिया प्राणिमित्र संघटनेचे अध्यक्ष नीतेश खरे, शिवसेना शिव कामगार संघटनेचे खालिद मामू, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक निखिल कविश्वर, देविदास कडू, संजय घोणे, माणिक मराठे, विशाल पाडाळे, बिंद्रा गणात्रा, आरोही तळेगावकर, पूजा गायकवाड, सुवर्णा अकोलकर आदी याप्रसंगी उपस्थित होते. 

मुक्या प्राण्यांचा छळ थांबविण्यासाठी तयार करण्यात आलेले कायदे कालबाह्य़ झाले आहेत. कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे. मुक्या प्राण्यांच्या संगोपनासाठी सेस इंडिया आणि नगरपरिषदेने सुरू केलेला उपक्रम कौतुकास पात्र आहे. नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे, असे अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी सांगितले.

परदेशी श्वान विकत घेण्यापेक्षा भटके श्वान दत्तक घ्यावेत. जे नागरिक श्वान पालन करतात. त्यांनी श्वानाला फिरायला नेल्यास स्वच्छतेविषयी पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी रवी पवार यांनी केले. नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत लोणावळा शहराला पारितोषिक मिळाले. नागरिकांनी सहकार्य केल्यास उपक्रम चांगल्या पद्धतीने राबविण्यात येईल, असे नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या.

याप्रसंगी सेस इंडिया तसेच शालेय विद्यार्थ्यांकडून प्राण्यांचे संगोपनाबाबत जनजागृतीपर नाटिका सादर करण्यात आली. कार्यक्रमात श्वान आणि मांजरांचा फॅशन शो सादर करण्यात आला. नागरिकांनी या कुंडाचे जतन करावे, कुंडात खाद्यपदार्थ, पाणी भरून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button