breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडी

नागपूरचे महापौर संदीप जोशीं यांचा राजीनामा

नागपूरच महापौर संदीप जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अखेर 13 महिन्यांचा कालावधी पुर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उपमहापौर मनीषा कोठे यांनीही राजीनामा दिला आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतरच महापौर निवडीच्यावेळी संदीप जोशी व दयाशंकर तिवारी यांनी महापौर पदावर दावा केल्याने पक्षाने महापौरपदी प्रत्येकी 13 महिन्यांचा कालावधी वाटून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार संदीप जोशी यांनी 22 नोव्हेंबर 2019 रोजी महापौरपदाची सूत्रे स्वीकारली होती.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांची आयुक्त म्हणून वर्णी लागल्यानंतर महापौर जोशी व मुंढे यांच्यात अनेक निर्णयांमुळे वाद निर्माण झाले होते. भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघाचे तत्कालीन आमदार अनिल सोले यांचे तिकीट कापून संदीप जोशी यांना उमेदवारी दिली. मात्र काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांनी त्यांचा पराभव केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button