breaking-newsराष्ट्रिय

प्रसिद्ध चित्रकार चंदामामा शंकर यांचे वयाच्या ९७व्या वर्षी निधन

चेन्नई – लहान मुलांचे प्रसिद्ध नियतकालीक ‘चांदोबा’ (चंदामामा)मधील चित्रकार के. सी. शिवशंकर उर्फ ‘चंदामामा शंकर’ यांचे काल निधन झाले. तामिळनाडूतील तिरुपुरमध्ये आपल्या राहत्या घरी त्यांनी वयाच्या ९७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

शिवशंकर यांचा जन्म तामिळनाडूमधील एरोडजवळील एका गावात झाला होता. त्यांचे वडील तेथील एका शाळेत शिक्षक होते आणि त्यांची आई गृहिणी होती. बी. नागी रेड्डी आणि चक्रपाणी यांनी चंदामामा या मासिकाची सुरुवात केली होती. सुरुवातीला हे मासिक तेलुगुमधून प्रकाशित होत असे. १९४७ला या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला होता. २०१३ साली हे मासिक बंद करण्यात आले. चांदोबा मासिकामधील विक्रम-वेताळच्या कथांमधील विक्रम आणि वेताळ या पात्रांना रेखाटणारे कलाकार म्हणजेच शिवशंकर. चांदोबा मासिकाच्या मूळ डिझाईन टीममधील ते अखेरचे जिवंत सदस्य होते. विक्रम-वेताळचे आयकॉनिक चित्र त्यांनी १९६०मध्ये रेखाटले होते. ते चित्र आणि खाली त्यांची सही हे चांदोबा वाचणाऱ्या सर्वांच्याच कायम स्मरणात राहील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button