breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रशासन- लोकप्रतिनिधींच्या सहभागातून राज्यातील पहिले कोविड केअर सेंटर कार्यान्वयीत!

पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार महेश लांडगे यांचा आदर्श उपक्रम

दिघी आणि मोशी येथे कोविड केअर सेंटरचे स्वातंत्र्य दिनी लोकार्पण

पिंपरी । प्रतिनिधी

प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सभागातून प्रभागनिहाय कोविड केअर सेंटर उभारण्याचा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग आज पिंपरी-चिंचवडमध्ये यशस्वी झाला. भोसरीचे आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या दोन कोविड केअर सेंटरचे स्वातंत्र्य दिनी (शनिवार, दि. 15 ऑगस्ट ) लोकार्पण करण्यात आले.

पिंपरी-चिंचवडमधील भाजपा शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून प्रभागनिहाय कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहेत. दिघी आणि मोशी येथील सेंटरचे लोकार्पण आज (स्वातंत्र्य दिनी) करण्यात आले.

यावेळी दिघीतील स्थानिक नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, नगरसेविका निर्मला गायकवाड, हिराबाई उर्फ नानी घुले यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा उपजिल्हाधिकारी अजित पवार, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.

तसेच, साईनाथ सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने मोशी येथील कोविड केअर सेंटरच्या लोकार्पण कार्यक्रमात नगरसेवक वसंत बोराटे, माजी महापौर राहुल जाधव , नगरसेविका सारिका सस्ते, अश्विनी जाधव, शिवसेना संघटक धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठ ताण निर्माण झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागातून प्रभागनिहाय कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहेत. प्रत्येक प्रभागात किमान १०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभागातील कोरोनाबाधित रुग्णांना ज्यांना मोठ्याप्रमाणात लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना घरापासून जवळच उपचार उपलब्ध होतील. तसेच, प्रभागातील स्थानिक डॉक्टर आणि कर्मचारी त्याठिकाणी पूर्ण महिन्याचे नियोजन करुन सेवा बजावतील.

दरम्यान, महाराष्ट्रात २८८ विधानसभा सदस्य आहेत. कोरोनाची परिस्थिती संपूर्ण राज्यात आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांच्या कालावधित एकाही विधानसभा सदस्याने लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या सहभागातून कोविड केअर सेंटर उभारण्याचा आदर्शवत प्रयत्न केला नाही. आमदार महेश लांडगे यांची संकल्पना महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारी आहे, अशी भावना सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड यांनी व्यक्त केली.

***

दिघी आणि मोशीतील नागरिक- डॉक्टरांचे आभार…

प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहभागाने कोविड केअर सेंटर उभारण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे. त्यासाठी दिघी येथील राघव मंगल कार्यालय, तसेच मोशी येथील रामकृष्ण लॉन्स येथे कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. कोरोना रुग्ण आढळलेल्या कुटुंबियांना नागरिक परकेपणाची वागणूक देतात. कोविड केअर सेंटर आपल्या सोसायटीशेजारी उभारण्यासाठी विरोध करतात. मात्र, मोशी आणि दिघी येथील ग्रामस्थ, नागरिकांनी पिंपरी-चिंचवडकरांसमोर आदर्श उभा केला. कोविड केअर सेंटरसाठी जागा उपलब्ध झाली. तसेच, या परिसरातील डॉक्टर आणि संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक पुढाकार घेत कोविड केअर सेंटरमध्ये सेवा करण्याची जबाबदारी घेतली. त्याबाबत लोकप्रतिनिधी म्हणून मी कृतज्ञता व्यक्त करतो, अशी प्रतिक्रीया यावेळी आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button