breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करेन – नामदेव ढाके

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराला पाण्याची कमतरता भासत असून आंध्रा, भामा धरणातील मंजूर कोट्यातील पाणी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच, कामगारनगरी असलेल्या शहरातील कामगारांचे आरोग्य, शिक्षण क्षेत्राशी निगडीत प्रश्न सोडविण्यास मदत करणार असल्याचे, अश्वासन पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे गटनेते नामदेव ढाके यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पक्षनेते एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर या पदासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नामदेव ढाके यांच्या नावाची निवड करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे ढाके यांच्या नावाची शिफारस देखील केली. त्यानुसार आज पालिकेत भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. सर्व नगरसेवकांचा ठराव तयार करून विभागीय आयुक्त म्हैसेकर यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. त्यांचे पत्र आल्यानंतर ढाके यांची पक्षनेते पदी निवड होणार आहे. तत्पुर्वी, पक्षाने ढाके यांची पालिकेतील गटनेते पदी निवड केली आहे. बैठकीत शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी महापौर राहूल जाधव, नितीन काळजे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, उपमहापौर तुषार हिंगे, माजी पक्षनेते एकनाथ पवार, शहर सरचिटणीस अमोल थोरात आदी यावेळी उपस्थित होते.

ढाके म्हणाले की, भाजपकडून नागरिकांच्या आपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी अटोकाट प्रयत्न करणार आहे. कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, अथवा त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, तो तातडीने कसा मार्गी लागेल, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. शहराला पाणी पुरवठ्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे आंध्र, भामा धरणातील मंजूर कोट्याचे पाणी शहरात आणण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, असेही ढाके म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button