breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘प्रभास’च्या आणखी एका मोठ्या सिनेमाची घोषणा, ‘तान्हाजी’ फेम ओम राऊतचं असणार दिग्दर्शन

मुंबई: सुपरस्टार प्रभासने इन्स्टाग्रामवर त्याच्या नव्या प्रोजेक्टबाबत हिंट दिल्यानंतर त्याच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडलेला होता. ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ या बिग बजेट आणि बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करणाऱ्या सिनेमाच्या दिग्दर्शकाबरोबर प्रभासचा हा नवा प्रोजेक्ट असणार आहे. दिग्दर्शक ओम राऊत आणि प्रभास ही जोडी एकत्र दिसणार म्हटल्यावर चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता लागलेली आहे.

प्रभासने या प्रोजेक्टबाबत इन्स्टाग्रामवर संकेत दिल्यानंतर काही तासातच या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आलेले आहे. साहो स्टार दिग्दर्शक ओम राऊतच्या ‘आदीपुरुष’ या अॅक्शन सिनेमामध्ये दिसणार आहे. हा सिनेमा ‘Prabhas 22’ असणार आहे. ‘Celebrating the victory of good over evil’ अशी या सिनमाची टॅगलाइन असणार आहे.

https://www.instagram.com/p/CD_jO3GJu_Q/?igshid=nvowgjbezq7a

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button