breaking-newsपिंपरी / चिंचवड

प्रभाग १३ मधील नागरिकांना राशन किट घरपोच देणार – उत्तम केंदळे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकाने दक्षता म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन केले आहे. लॉकडाउनच्या या निर्णायक आणि बिकट काळात गरजू नागरिकांना उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून भाजप प्रभाग क्र १३ मधील गरजू कुटुंबापर्यंत रेशन किट भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली घरपोच पोहचविण्याचा निर्धार नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे व कमल घोलप तसेच प्रभागातील सर्व भाजप पदाधिकारी यांनी केला आहे.

त्यामध्ये आत्तापर्यंत केंदळे व घोलप यांच्या वतीने अनेक गरजू कुटुंबासाठी या उपक्रमातून गरजू कुटुंबाना मोफत रेशन किट वाटप करण्यात आले
त्याचबरोबर शहरात सर्व प्रथम भाजपच्या वतीने नगरसेवक केंदळे आणि घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात सॅनिटायजर औषध फवारणी स्वखर्चातून करण्यात आली व काही ठिकाणी प्रभागात गरजूंना दैनंदिन जेवण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे.

अश्या हजारो कुटुंबाना मोफत धान्य वाटप करण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केले जात आहे. तसेच यापुढेही प्रभागातील अजूनही अनेक गरजू कुटुंबासाठी मोफत रेशन किट देण्यात येणार आहे असे केंदळे यांनी सांगितलेया उपक्रमासाठी भाजप पदाधिकारी उत्तम केंदळे युवा मंच व बापू घोलप युवा मंचचे सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button