breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रजासत्ताक दिनानिमित्त कै.नारायणराव चोंधे शिक्षण संस्था व कै.ज्ञानोबा चोंधे प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार

पिंपरी | प्रतिनिधी 

प्रभाग क्र.२६ विशालनगर पिंपळे निलख येथील कै. नारायणराव चोंधे शिक्षण संस्था व कै. ज्ञानोबा चोंधे प्रतिष्ठान यांच्यावतीने ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लायन्स क्लब ऑफ पुणे सेलिब्रेशन पुणेचे अध्यक्ष संदिप पाटील होते. ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोरोना काळात कोरोना – विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असताना अनेक नागरिकांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावलेल्या व जनसेवा केलेल्या डॉ. संदिप गावडे, डॉ. संदिप पाटील, डॉ. जबीन पठाण, डॉ. प्रदिप पाटील, डॉ. योगेश्वर सानप, डॉ. कार्तिकी भुते, डॉ.सुरेखा रंगदळ व परिसरातील इतर डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी अर्चना प्रकाश शिंदे, वनिता दिपक माकर, वैजयंती विशाल आर्लीकट्टी व सर्व कर्मचारी यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे.

केमिस्ट व मेडिकल चालक श्री मेडिकलचे श्री भास्कर कळसकर, हेल्थ अँड मोअर मेडिकलच्या रूपाली सचिन राजगुरू, कृष्णा मेडिकलच्या कांचन रामलालजी चौधरी, विजय मेडिकलचे रमेश गलाराम चौधरी, बालाजी मेडिकलचे महेंद्र गणपत बिराजदार, संजीवन मेडिकलचे मंगेश देवराम गावडे, श्री दत्त मेडिकलचे सचिन दत्तात्रय मुरकुटे व परिसरातील इतर मेडिकलच्या सर्व चालक त्याचबरोबर पुणे ते पंढरपूर व पुणे ते शिर्डी असेच अनेक वेळा सायकल दिंडीचे आयोजन करून पर्यावरण समतोल व संवर्धन संदेश आणि निरोगी जीवन जगण्याचा जीवनमंत्र युवा पिढीला देणार्या विशालनगर पिंपळे निलख येथील इंडियन सायकल क्लबचे चंद्रकांत ववले व सर्व सभासद व वरील सर्व कोरोना योध्दांना शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

लायन्स क्लब ऑफ पुणे सेलिब्रेशन पुणे यांच्यातर्फे विद्या विनय निकेतन विद्यालयाचा प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांच्या कोरोना पासून बचाव होण्यासाठी विद्यार्थ्यांना १००० मास्क, २ एक्सोमिटर मशिन व २ थर्मामिटर मशिन देण्यात आले आहे. त्याप्रसंगी प्रभाग क्र.२६ च्या कार्यक्षम नगरसेविका आरतीताई सुरेश चोंधे, भाजयुमो शहराध्यक्ष संकेत सुरेश चोंधे, त्याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ पुणे सेलिब्रेशन पुणेचे अध्यक्ष संदिप पाटील, भरत इंगवले, शशिकांत कदम, सतिष गॅजगे, जितेंद्र ठोंबरे, पुंडलिक दरेकर, जयसिंगराव डुंबरे सर, आनंदा दौडकर परिसरातील इतर नागरिक व विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंतराव गर्जे व नूतन भांबुरे, सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना नगरसेविका आरतीताई चोंधे व भाजयुमोचे शहराध्यक्ष संकेत सुरेश चोंधे यांची होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश झोडगे सर यांनी केले आहे.

वाचा- काळेवाडीत नारी शक्ती महिला बचत गटाची स्थापना

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button