breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीकरांना पाणी कमी पडणार नाही याची अधिका-यांनी दक्षता घ्यावी – आमदार महेश लांडगे

ई क्षेत्रिय कार्यालयात बैठक घेऊन दिल्या सूचना

पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून भोसरी परिसराच्या काही भागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोणालाही पाणी कमी पडणार नाही, याची दक्षात घ्यावी. नागरिकांच्या पाणीपुरवठ्याबाबत कोणत्याही तक्रारी येऊ देऊ नका. नागरिकांना स्वच्छ, मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा करा, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना केल्या आहेत.

भोसरी परिसरातील पाणीपुरवठ्या संदर्भात आमदार लांडगे यांनी मंगळवारी (दि. 22) ‘ई’ क्षत्रिय कार्यालयात पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, वॉलमान आणि नगरसेवक यांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीला ‘ई’ क्षेत्रीय कार्यलयाच्या अध्यक्षा भीमाबाई फुगे, ‘फ’ कार्यालयाच्या अध्यक्षा कमल घोलप, क्रीडा समितीचे सभापती संजय नेवाळे, नगरसेवक नितीन लांडगे, संतोष लोंढे, राहुल जाधव, सागर गवळी, लक्ष्मण उंडे, विकास डोळस, राजेंद्र लांडगे, कुंदन गायकवाड, वसंत बोराटे, नगरसेविका अश्विनी जाधव, सुवर्णा बुर्डे, निर्मला गायकवाड, सारिका लांडगे, यशोदा बोईनवड, सोनाली गव्हाणे, प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव, पांडुरंग भालेकर, सागर हिंगणे, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, सचिन तापकीर, नितीन बोराटे, पाणीपुरवठा अधिकारी एस. ए. तुपसाखरे, व्ही. बी. शिंदे, वि. भी. कांबळे आदी उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, पवना धरणात मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. भोसरी परिसरातील काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. वॉलमॅन, अधिकारी यांनी जागेवर जाऊन पाणीपुरवठा कमी दाबाने का होत आहे, याची पाहणी करावी. काय प्रॉब्लेम असेल तो त्वरित सोडवावा. महापालिकेच्या पाईपलाइन, व्हॉल्व्ह, पाण्याच्या टाक्यांजवळ मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. ती रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. काही प्रभागात सकाळी सहा ते नऊ या वेळेत तर काही भागात संध्याकाळी सहा ते नऊ यावेळेत पाणी सोडावे आणि पाणी जपून वापरा, पाण्यासंदर्भात तक्रारी येता कामा नये. तसेच दूषित पाणीपुरवठा होऊ नये. पावसाळ्यापूर्वी पाण्याच्या टाक्या साफ करण्यात याव्यात” अधिका-यांबरोबर प्रत्येक वॉर्डात पाणी आले की नाही ? हे पाहण्याची जबाबदारी नगरसेवकांनी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी नगरसेवकांना केल्या. दूषित, ड्रेनेज मिश्रीत पाणी पुरवठा होता कामा नये, याची दक्षता घ्यावी. नागरिकांना स्वच्छ, मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, आशा सूचनाही लांडगे यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button