breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

प्रकाश सिंह बादल यांचा पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय

नवी दिल्ली – मोदी सरकारने शेतकऱ्यांना फसवलं आहे या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो असं म्हणत पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार परत केला आहे. केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे जाचक आहेत. शेतकऱ्यांसाठी घातक आहेत. या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी घेणंदेणं नाही या गोष्टींचा निषेध करत मी मला मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे असंही प्रकाश सिंह बादल यांनी म्हटलं आहे. अकाली दलाने कृषी कायद्यांचा निषेध नोंदवतच एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता केंद्र सरकारवर टीका करत प्रकाश सिंह बादल यांनी त्यांचा पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारनं केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात आता देशभरात वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. कृषी कायद्याच्या मुद्द्यावरुनच भाजपचा मित्रपक्ष राहिलेल्या शिरोमणी अकाली दलानं NDAतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांनी ‘पद्म विभूषण’ पुरस्कार परत करत असल्याचं सांगितलं आहे. तसं पत्रच बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलं आहे. यापूर्वी कृषी कायद्याला विरोध करत शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रातील मंत्री हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपचा NDAतील सर्वात जुना मित्र असलेला शिरोमणी अकाली दल युतीतून बाहेर पडला आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसची महत्वाची बैठक

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्र विधानभवनात काँग्रेसची महत्वाची बैठक होत आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित आहेत. या बैठकीत दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्याचा ठराव मंजूर करण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री आणि शेतकरी संघटनांची बैठक सुरु

तिकडे दिल्लीमध्ये 40 शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्यात बैठक सुरु आहे. यामध्ये शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी 5 कायदे परत घेण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यात कृषी कायद्यांसह वायू प्रदूषणाबाबतच्या कायद्याचाही समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button