breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रकाश आंबेडकर यांनी हैद्राबादमध्ये खासदार ओवैसीची घेतली भेट

मुंबई – वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज (रविवारी) एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदोद्दीन ओवैसी यांच्या हैदराबादमधील कार्यालयास भेट दिली.

आंबेडकर यांच्यासोबत एमआयएमचे औरंगाबाद (मध्य)चे आमदार सय्यद ईम्तियाज जलिल, डॉ.गफ्फार कादरी यांनी हैदराबादला ओवैसी यांच्या दारुस्सलाम या ठिकाणी त्यांची भेट घेतली. दारुस्सलाम येथे ओवैसी बंधूचा जनता दरबार भरतो. या ठिकाणी एमआयएमचे हैदराबादमधील सर्व आमदार, नगरसेवक नागरिकांना भेटतात. तिथल्या कामाची पध्दत कशी असते हे आंबेडकरांनी जाणून घेतले.

ओवैसी बंधूचे ओवैसी हॉस्पीटल, असरा हॉस्पीटललाही त्यांनी भेट दिली. गेल्या वीस वर्षापासून या हॉस्पीटलमध्ये फक्त 10 रूपयात रूग्णांवर उपचार करण्यात येतो. त्याचीही माहिती आंबेडकर यांनी जाणून घेतली. तसेच शाळा, महाविद्यालयांची पाहणीही केली. यावेळी एमआयएमचे राष्ट्रीय सचिव पाशा कादरी, एमआयएमचे हैदराबादमधील आमदार यांची उपस्थिती होती.

खासदार ओवैसी यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत समारंभालाही आंबेडकरांनी हजेरी लावली. ओवैसी आणि आंबेडकर यांच्यात महाराष्ट्र दौ-याबाबत तसेच जागा वाटपाबाबत चर्चा झाली.

आंबेडकरांची काँग्रेस नेत्यांसोबतही चर्चा होणार..

प्रकाश आंबेडकरांची काँग्रेस नेत्यांसोबतही चर्चा होणार आहे. परंतु आंबेडकर हे एमआयएमची साथ सोडणार नाहीत. काँग्रेस आंबेडकरांना अकोला मतदार संघात पाठिंबा देण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा पाठिंबा आंबेडकर घेतील का याकडे एमआयएमच्या नजरा लागल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button