breaking-newsमनोरंजन

या तारखेला मलायका- अर्जुन अडकणार विवाहबंधनात?

बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेलं जोडपं मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पुढील महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहेत अशा चर्चा होत्या. या दोन्ही जोडप्यांच्या निकटवर्तीयांनी मलायका- अर्जुनच्या विवाहबद्दलच्या चर्चांना दुजोरा दिला असून ही जोडी एप्रिल महिन्यात विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मलायका आणि अर्जुन १९ एप्रिलला विवाहगाठ बांधतील असं म्हटलं जात आहे. स्पॉटबॉय इच्या माहितीनुसार ही जोडी या तारखेला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. लग्नासाठी केवळ मलायका आणि अर्जुनचे निकटवर्तीयच उपस्थित राहणार आहे. या यादीत करिष्मा, करीना, दीपिका, रणवीर या कलाकारांचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे.

मलायका आणि अर्जुन दोघंही ख्रिश्चन पद्धतीनं लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. मलायकानं २०१७ मध्ये पती अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला त्यानंतर ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करू लागली. २०१८ मध्ये मलायका आणि अर्जुनचे मिलानमधले फोटो इंटरनेटवर लीक झाले होते. मिलानच्या रस्त्यावर हातात हात घालून फिरणाऱ्या या जोडप्याची तेव्हापासून चर्चा होती.

मलायका आणि अर्जुन दोघंही अनेकदा एकत्र पहायला मिळतात मात्र या दोघांनी कधीही आपल्या नात्याची कबुली दिली नाही. ही जोडी  १९ एप्रिलला लग्नाच्या बेडीत अडकणार अशी चर्चा असली तरी दोघांनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button