breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पोलिस दलातील 1233 अधिकारी आणि कर्मचारी कोरोनामुक्त, 334 जण पुन्हा सेवेत दाखल- गृहमंत्री

मुंबई | महाराष्ट्रातील मुंबई शहराभोवती कोरोना व्हायरसचा विळखा अधिक तीव्र आहे. त्यामुळे नागरिकांसह सुरक्षेसाठी दक्ष असलेले पोलिसही कोविड-19 च्या कचाट्यात सापडले आहेत. मुंबई पोलिस दलातील कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंता वाढवत असली तरी त्यातील अनेकजण ठणठणीत बरे झाल्याची दिलासादायक माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

मुंबई पोलिस दलातील 1233 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तसंच त्यापैकी 334 पोलिस कामावर पुन्हा रुजू झाल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. या सर्व कोरोना योद्धांचे गृहमंत्र्यांनी अभिनंदन केले असून भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या मुंबई पोलिसांचा मला अभिमान वाटतो, अशा भावना त्यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

काल (11 जून) हाती आलेल्या आकडेवारीनुसार, मुंबई पोलिस दलातील तब्बल 2028 पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर मुंबईत तैनात असलेल्या SRPF च्या 82 जणांना कोविड-19 चा संसर्ग झाला आहे. दरम्यान कोरोना व्हायरस बाधित पोलिस आणि SRPF च्या जवानांवर योग्य उपचार आणि उत्तम सुविधा मिळतील असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button