breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

त्या गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट होण्यास नकार

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दवाढीत खेड तालुक्यातील काही गावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. परंतु, खेड तालुक्यातील गावांचा महापालिकेत समाविष्ट होण्यास विरोध आहे. याउलट चाकण, राजगुरुगर, आळंदी अशी स्वतंत्र महापालिका करण्याची भूमिका या गावांची आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दवाढीसाठी शासकीय पातळीवर हालचाली वेगाने सुरू आहेत. यामध्ये हवेली, मावळ, मुळशी व खेड तालुक्यातील आळंदी, चिंबळी, कुरुळी, निघोजे, मोई, म्हाळुंगे, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी या गावांचा समाविष्ट करावा. यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका अनूकूल आहे. तसा प्रस्ताव तत्कालीन आयुक्तांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे. परंतु, यावर आजपर्यंत काहीही कार्यवाही झाली नाही.

चाकण नगरपरिषदेची हद्दवाढ करून खेड तालुक्यातील सोळा गावे मिळून चाकण नगरपालिका करण्यात यावी, हा प्रस्ताव पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. चाकण नगरपालिकेबरोबरच पिंपरी – चिंचवड महापालिकेतही समाविष्ट होण्यास या सोळा गावांचा विरोध आहे. वरील गावांतील ग्रामपंचायतीने ही ठराव करून पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत गावे समाविष्ट करण्यास विरोध दर्शविला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button