breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

पॅट कमिंन्सच्या चेंडूमु‌ळे मोहम्मद शमीचा हात फ्रॅक्चर, कसोटी सामन्यातून बाहेर

एडिलेड – ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताने पराभवाची मालिका सुरु ठेवली आहे. पहिल्या सामन्यात ८ विकेट्सने पराभव झाला तर, दुसऱ्या सामन्यात अवघ्या ३६ धावा करून सर्वांत कमी धावसंख्येची नोंद केली आहे. त्यातच, भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. फ्रॅक्चर झाल्यामुळे मोहम्मद शमीला मैदान सोडावे लागणार आहे. म्हणजेच यापुढे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकणार नाही. शमीच्या जागी भारतीय संघात मोहम्मद सिराज किंवा नवदीप सैनी या पैकी एकाला संधी मिळू शकते.

दुसऱ्या डावात भारताची अखेरची जोडी मैदानावर असताना ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंन्सचा चेंडू मोहम्मद शमीच्या हाताला लागला. त्यामुळे शमीला मैदान सोडावे लागले आणि भारताने ९ बाद ३६ वर डाव घोषीत केला. शमी दुसऱ्या डावात गोलंदाजीला देखील येऊ शकला नाही. वैद्यकीय तपासणीत त्याच्या मनगटाला फॅक्चर झाल्याचे आढळले. यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरीत कसोटी मालिकेत शमी खेळणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे.

कसोटी क्रिकेटमधील सर्वात निचांकी धावसंख्या नोंदवल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून झालेला पराभव या धक्क्यातून सावरण्याआधीच टीम इंडियाला शमीच्या फॅक्चरची बातमी कळाली. मैदानातून बाहेर आल्यावर शमीला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे फॅक्चर झाल्याचे समजले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शमीच्या हाताला फॅक्चर आहे आणि कसोटी मालिकेतील उर्वरीत सामन्यात त्याची खेळण्याची शक्यता कमीच आहे.

शमीच्या जागी भारतीय संघात मोहम्मद सिराजला संधी मिळण्याची शक्यता आहे. दोन सराव सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली होती. मेलबर्न मैदानावर होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात तो पदार्पण करू शकतो. भारताचा कर्णधार विराट कोहली देखील पुढील सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाही. तो बाप होणार असून त्यासाठी भारतात येणार आहे. विराट नसल्याने त्याच्या जागी पर्यायी खेळाडू म्हणून कोणाला घ्यायचे असा प्रश्न पडलेला असताना आता शमीच्या फॅक्चरमुळे भारतीय गोलंदाजीची धार कमी होईल की काय अशी काळजी वाटू लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button