breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या ५२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

मुंबई : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विलासराव देशमुख यांचे  पुत्र धीरज, दोन विद्यमान आमदारांसह ५२ उमेदवारांची दुसरी यादी कॉंग्रेस पक्षाने मंगळवारी रात्री जाहिर केली.

कॉंग्रेसच्या पहिल्या यादीत ५१ उमेदवारांची यादी जाहिर केली होती. पक्षाच्या वाटय़ाला १३५ जागा येणार असून ऊर्वरित ३० पेक्षा जास्च उमेदवारांची यादी उद्या रात्रीपर्यंत जाहिर होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढवावी असा पक्षाचा आग्रह होता. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चव्हाण यांना सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. तरीही चव्हाण यांनी राज्याच्या राजकारणातच राहणे पसंत केले. त्यांना कराड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

लातूर शहर मतदारसंघातून विद्यमान आमदार अमित देशमुख यांना उमेदवारी यापूर्वीच जाहिर करण्यात आली होती. आता लातूर ग्रामिण मतदार संघातून त्यांचे बंधू धीरज देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कुणाल पाटील व राहुल बोंद्रे या दोन विद्यमान आमदारांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, माजी आमदार कैलास बोरंटयाल, नागपूरमधील विकास ठाकरे आदींना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

मुंबईमध्ये पत्रकार युवराज मोहिते यांना गोरेगावमधून, तर जगदिश अमिन यांना अंधेरी, दहिसरमधून अरुण सावंत, मुलुंडमधून गोविंद सिंग, प्रवीण नाईक यांना माहिम, जोगेश्वरीतून सुनील कुमरे, राधिका गुप्ते डोंबिवली, कांचन कुलकर्णी कल्याण पश्चिम आणि भिवंडीतून शोएब गुड्डू यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. शिवडीतून उदय फणसेकर,कांदीवली पूर्व अजंता यादव, मलबार हिल हिरा देवसाई यांना उमेदवारी मिळाली आहे.

याखेरीज सांगली येथून पृथ्वीराज पाटील यांना संधी देण्यात आली आहे. पेणमधून नंदा म्हात्रे, शिवाजीनगर मतदारसंघातून दत्तात्रय बहिरट हे उमेदवार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button