breaking-news

पूना हाॅस्पिटलच्या डाॅक्टरची अात्महत्या

पुणे ( महा ई न्यूज ) –  पूना हाॅस्पिटलच्या डाॅक्टरने हाॅस्पिटलच्या रेस्टरुममध्ये गळफास घेऊन अात्महत्या केल्याची धक्कादायक घटना समाेर अाली अाहे. त्यांच्याजवळ एक सुसाईट नाेट सापडली असून अात्महत्येसाठी काेणालाही जबाबदार धरु नये असे लिहीण्यात अाले अाहे.

डॉ. शशिकांत बम(वय 63) असे अात्महत्या केलेल्या डाॅक्टरचे नाव अाहे. बम हे पूना हाॅस्पिटलचे सिनिअर डेंटिस्ट हाेते. सकाळी 9 च्या सुमारास ते हाॅस्पिटलमध्ये अाल्यानंतर ते थेट रेस्टरुममध्ये गेले. सर्वांना ते अाराम करत असावेत असे वाटले. परंतु बराच वेळ झाल्यानंतरही ते बाहेर न अाल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी अात जाऊन पाहिले असता त्यांनी गळफास घेऊन अात्महत्या केली हाेती. त्यांच्या अात्महत्येमुळे हाॅस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना चांगलाच धक्का बसला अाहे. बम यांच्या जवळ सापडलेल्या सुसाईड नाेटमध्ये माझ्या अात्महत्येस काेणालाही जबाबदार धरु नये, मी निराश हाेऊन आत्महत्या करत अाहे. ज्याला मी स्वतःच जबाबदार अाहे असे लिहीण्यात अाले अाहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button