breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात ब्रेक फेल झालेल्या ट्रकची ६ वाहनांना धडक

पुणे ( महा ई न्यूज ) –  साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची कात्रजच्या नव्या बोगद्याकडून येताना उतारावर ब्रेक फेल झाल्याने त्याने पुढील किमान ८ वाहनांना धडक दिली. त्यात ८ जण जखमी झाले आहेत़.जखमीपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे़. ही घटना वडगाव येथील पुलावर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली़.

याबाबत सिंहगड पोलिसांनी सांगितले की, साताऱ्याहून नारळ घेऊन जाणाऱ्या तामिळनाडुतील ट्रकचे उतारावर नवले पुल व वडगाव पुलादरम्यानच्या विश्वास हॉटेलसमोर ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले़. त्यामुळे त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले़. त्याने पुढे असलेल्या वाहनांना अक्षरश: चिरडले़. त्यामध्ये १ दुचाकी, २ कार, २ रिक्षा आणि एक मिनी ट्रकचा समावेश आहे़. या अपघातात २ पुरुष व एक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत़.  या अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस तातडीने घटनास्थळी आले़. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली़. तोपर्यंत नागरिकांनी जखमींना जवळच्या नवले हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत़.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button