breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : शिवसेनेचे मंत्री राठोड यांना पक्षश्रेष्ठींनी काय दिली तंबी? वाचा!

मुंबई :  पूजा चव्हाण प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागला आहेत. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणात थेट हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यानंतर शिवसेनेकडून मंत्री संजय राठोड यांना तंबी देण्यात आली आहे. माध्यमांशी बोलू नका, असे आदेश राठोडांना पक्षाकडून देण्यात आले आहेत.

घटना गंभीर असल्यानं राठोडांचं वक्तव्य आणखी अडचणी वाढवू शकतात, त्यामुळे पक्षाने सावध पवित्रा घेतला आहे. भाजप आक्रमक असताना राठोड यांच्या कुठल्याही वक्तव्यानं पक्षाची अडचण होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा धुरळा नुकताच खाली बसलेल्या असताना आणखी एक मंत्री महिलेच्या प्रकरणात सापडल्याने सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

पूजा चव्हाण या तरुणीने रविवार 7 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. त्यानंतर आघाडी सरकारमधील मंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्याच्या कथित संभाषणाच्या 11 क्लिप व्हायरल झाल्या. त्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट वन मंत्री संजय राठोड यांच्यावरच आरोप करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. राठोड यांच्या मुसक्या आवळा आणि त्यांच्यावर सखोल मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, 23 वर्षांची पूजा चव्हाण काहीच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळीमधून पुण्यात आली होती. स्पोकन इंग्लिशचे क्लास करण्यासाठी ती पुण्याला जात असल्याचं तिने नातेवाईकांना सांगितलं होतं. पण पुण्याच्या वानवडी भागात मित्रांसोबत राहणाऱ्या पूजाला या काळात हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज भासली. त्यानंतर काही दिवस गेले आणि रविवारी मध्यरात्री पूजाने वानवडी भागातील या इमारतीवरून उडी मारून तिचं आयुष्य संपवलं. त्यानंतर पूजाने हे टोकाचं पाऊल का उचललं याची उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button