breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण! अरुण राठोड अद्यापही बेपत्ता; घरात लाखो रुपयांची चोरी

बीड – बीड येथील पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. त्यातच या प्रकरणातील संशयित आरोपी अरुण राठोड हा बेपत्ता आहे. तो अद्यापही घरी आलेला नाही. त्याचे कुटुंबीय घरी परतले असून त्याच्या घरात लाखो रुपयांची चोरी झाली आहे.

पूजा चव्हाणचा मित्र अरुण राठोड हा बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे राहतो. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरुणचं नाव आल्यानंतर अरुण आणि त्यांचं कुटुंब बेपत्ता झालं होतं. त्याच्या घराला गेल्या चार दिवसांपासून कुलूप लावण्यात आलेलं होतं. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, चार दिवसानंतर अरुणचे कुटुंबीय गावात आले आहेत. मात्र, अरुण अजूनही बेपत्ता आहे. तो कुटुंबासोबत आलेला नाही. त्यामुळे अरुण नेमका कुठे आहे? असा सवाल केला जात आहे.

घरात लाखोंची चोरी

अरुणचं कुटुंब घरी आल्यानंतर त्यांना एकच धक्का बसला. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं त्याच्या कुटुंबीयांना दिसलं. कुटुंबीयांनी घराची झाडाझडती घेतल्यावर घरातून लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचं कुटुंबीयांच्या लक्षात आलं. घरात लाखोंची चोरी झाल्याने राठोड कुटुंबीयांच्या तोंडचं पाणी पळाले आहे.

तो आवाज अरुणचा नाही, त्याला गोवलं जातयं

अरुण राठोडच्या कुटुंबीयांनी गावात आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ऑडिओ कॉलमधील आवाज अरुणचा नाही. अरुणला या प्रकरणात गोवलं जात आहे. तो निर्दोष आहे, अशी प्रतिक्रिया अरुणची आई मीराबाई राठोड यांनी व्यक्त केली आहे.

दोन दिवसात माध्यमांसमोर येईल

अरुणचं कुटुंब गावात आलं असलं तरी अरुण मात्र अद्याप आलेला नाही. अरुण दोन दिवसात माध्यमांसमोर येईल, असं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं. मात्र, अरुण नेमका कुठं आहे? कुणासोबत आहे? तो समोर का येत नाही? असा सवाल करण्यात आला असता त्यांच्या नातेवाईकांनी बोलण्यास नकार दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button