breaking-newsमहाराष्ट्र

उदगीरमध्ये सास-याचा सुनेवर बलात्कार, वॉट्सअपवर क्लीप व्हायरल

  • उदगीर तालुक्यातील कौळखेड येथील घटना
  • नात्याला काळीमा फासल्याने परिसरात खळबळ

उदगीर, (प्रतिनिधी) – शेतातील जनावरांना चारा टाकण्यासाठी गेलेल्या सुनेवर सार-याने अतिप्रसंग करित तिच्यावर बलात्कार केला. या घटनेचा अन्य दोन साथीदाराच्या मोबाईलमध्ये फोटो व शुटींग केल्याची खळबळजनक घटना उदगीर तालुक्यातील कौळखेड येथे बुधवारी (दि.१३) दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे. पीडीत महिलेच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील कौवळखेळ येथील ३८ वर्षीय महिला शेतातील जनावरांना चारा (गुळी ) टाकण्यासाठी गेली होती. शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गेली असता तिचा सासरा बाबु पेमा राठोड (वय ६०) हा तिच्या पाठिमागून येऊन तिच्याशी झोंबा झोंबी करु लागला. तीने विरोध केल्यानंतर तोंड दाबुन तिला खाली पाडुन त्यांच्यावर बलात्कार केला. यावेळी पप्पु जाधव व रवि चव्हाण यांनी या घटनेचे चित्रीकरण मोबाईलमध्ये टिपले. भयभित झालेल्या पीडित महिलेने कशीबशी स्वतःची सुटका करुन घर गाठले. बदनामीला घाबरुन या घटनेची महिलेने कुठेच वाच्छता केली नाही.

मात्र, शुक्रवारी (दि.१५) पीडित महिलेच्या भावाने फोन करुन सांगीतले की, मोबाईलवर तुझा सासरा अतिप्रसंग करित असल्याचा फोटो व व्हिडिओ गावातील सर्वच व्हॉट्सअप व फेसबुकवर प्रसारित केल्याचे सांगीतले. भावाने दिलेल्या माहितीवरुन पीडित महिलेने सर्व हकिकत आपल्या भावाला व पतीला सांगितली. आजरोजी पीडितेने उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कलम ३७६, ३७६ (F) भादविं, सहकलम ६६ (C) (E) माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलिस निरिक्षक आनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button