breaking-newsराष्ट्रिय

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस शहीद

श्रीनगर : गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस अधिकारी शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये दोन अधिकारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू- काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या दलावर दहशतवाद्यांनी पुलवामा येथे हल्ला केला.

पुलवामा येथील प्रिछू भागात जॉईंट नाक्यापाशी दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये जवळपास दोन ते तीन पोलीस जखमी झाले. ज्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या पोलिसांपैकी एकाला लगेचच मृत घोषित करण्यात आलं. तर, फर्वरित दोन पोलिसांना श्रीनगर येथील एएमएचएस रुग्णालयात पुढील उपचारांसाठी पाठवलं आहे. या हल्ल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत माहितीमध्येसुद्धा एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची बाब उघड करण्यात आली

दरम्यान, हल्ला झालेल्या या परिसरामध्ये लगेचच स्थानिक पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराकडून कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये दहशतवाद्यांचा कसून शोधही घेतला गेला. गेल्या काही दिवसांपासून जम्मू- काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी कारवायांमध्ये झालेली वाढ पाहता भारतीय संरक्षण दलांकडूनही याबाबत सावधगिरीची पावलं उचलली जात आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button