breaking-newsराष्ट्रिय

पुन्हा सत्तेवर आलो तर परशुरामाचा पुतळा उभारू! मायावतींची घोषणा

लखनऊ – उत्तर प्रदेशात 2022 साली विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आतापासूनच आपली ‘वोट बँक’ वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. राम मंदिर भूमिपूजनामुळे भाजपाकडे जाणारी ब्राह्मण मते आपल्याला मिळावीत यासाठी बहुजन समाज पक्षानेही घोषणा केल्या आहेत. उत्तर प्रदेशात पुन्हा बहुजन समाज पक्षाचे सरकार सत्तेवर आले तर भगवान परशुरामाचा 108 फूट उंच पुतळा उभारू आणि त्याची स्थापना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे करू, अशी घोषणा बसपाच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी केली आहे.

मायावती यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना त्यांनी भाजपावर निशाणा साधत म्हटले की, ‘पाच ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाले. मात्र या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दलितांचे प्रतिनिधी म्हणून बोलावणे आवश्यक होते. तसेच काही दलित संत देखील आम्हाला निमंत्रण नाही म्हणून ओरडत होते. त्यामुळे भाजपाने संत आणि राष्ट्रपती कोविंद यांना बोलावले असते तर चांगले झाले असते असेही मायावतींनी यावेळी म्हटले. तसेच समाजवादी पक्षावर निशाणा साधत त्या म्हणाल्या की, समाजवादी पक्षाला जर भगवान परशुराम यांचा पुतळा उभारायचा असता तर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात उभारला असता. मात्र बसपा सपा सारखे करणार नाही, तर आम्ही जे बोलतो तेच करूनही दाखवतो. राज्यात चार वेळा सत्तेत आलेल्या बसपा सरकारने सर्व जाती, धर्माच्या महान संतांच्या नावावर अनेक योजना सुरू केल्या होत्या. जिल्ह्याला त्यांची नावे दिली होती. मात्र सपा सरकारने जातीयवादी मानसिकतेतून आणि द्वेष भावनेतून या योजना, नावे बदलली. बसपा सरकार सत्तेत आल्यावर पुन्हा पूर्वीसारखे करण्यात येईल, असे मायावती यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button