breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सला 1 कोटी 60 लाख 50 हजारांचा गंडा, गुन्हा दाखल

पुणे – राज्यातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सला तब्बल 1 कोटी 60 लाख 50 हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. पुण्यात हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी सौरभ विद्याधर गाडगीळ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, गाडगीळ यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रोहितकुमार शर्मा (वय 59) या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्‍टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगडमध्ये व्यवसाय सुरु करुन देण्यासाठी 50 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने प्रसिद्ध सराफ व्यावसायिक पु. ना. गाडगीळ यांना 1 कोटी 60 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सची शाखा चंदीगड येथे उघडण्यासाठी 50 कोटीचे कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवत रोहितकुमार शर्मा याने गाडगीळ यांच्या पुण्यातील कार्यालयात येऊन त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांचा विश्वास संपादन करुन कर्ज वितरणासाठी आणि प्रक्रिया शुल्क म्हणून फिर्यादींकडून 1 कोटी 60 लाख 50 हजार रुपये घेतले. मात्र पैसे देऊन अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही कर्जाची प्रक्रिया किंवा पैसे मिळत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे गाडगीळ यांच्या लक्षात आले. त्यानंतर या प्रकरणी सौरभ विद्याधर गाडगीळ (वय 43) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सध्या पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button