breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात पुन्हा पावसाचा इशारा

पुणे – पुण्यात पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. घाट भागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची ५१ ते ७५ टक्के शक्‍यता असल्याचेही खात्याने स्पष्ट केले.

अंदमानच्या समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुण्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत धुवाधार पाऊस पडला. हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या अरबी समुद्रात आहे. तेथे त्याची तीव्रता कमी होत असून, पुढील २४ तासांमध्ये या क्षेत्राचा प्रभाव संपेल. पाठोपाठ बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र पुढील २४ तासांमध्ये निर्माण होण्याची शक्‍यता आहे. सोमवारपर्यंत (ता. १९) त्याची तीव्रता वाढणार आहे. त्यानंतर ते वायव्य दिशेला पूर्व किनारपट्टीकडे सरकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे

पुण्यात सोमवारपासून (ता. १९) ते गुरुवारपर्यंत (ता. २२) ‘यलो अलर्ट’ दिला आहे. मंगळवारी (ता. २०) हा अलर्ट पुण्या-मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिला आहे. राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सोमवारी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या सूत्रांनी वर्तविला. यादरम्यान २४ तासांमध्ये १५.६ ते ६४.४ मिलिमीटर पाऊस पडेल, असेही तज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान, पुण्यात रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तीन मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये ८.८ मिलिमीटर पाऊस पडला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button