breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Big News : श्रीक्षेत्र देहू आता नगरपंचायत : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

आमदार सुनील शेळके यांच्या सहकार्याने प्रलंबित मागणी पूर्णत्वास

श्रीक्षेत्र देहूचे स्वतंत्र ओळख, ग्रामस्थांमध्ये आनंदोत्सव

तळेगाव दाभाडे | प्रतिनिधी

श्रीक्षेत्र देहूगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मंगळवारी मंत्रालयात घोषणा केली.

गेली अनेक वर्षे श्रीक्षेत्र देहूगावमधील ग्रामस्थांनी नगरपंचायतसाठी मागणी लावून धरली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ विधानसभा मतदार संघातील आमदार सुनील शेळके यांनी महाविकास आघाडी सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला. ग्रामस्थ आणि तीर्थक्षेत्र विश्वस्तांच्या प्रयत्नांना आमदार शेळके यांची साथ मिळाली.

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पुण्यशील पावनभूमी श्री क्षेत्र देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाल्याची अधिसूचना महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात घोषित केली. या महत्वाकांक्षी निर्णयामुळे श्रीक्षेत्र देहूगावसह सभोवतालच्या ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळणार आहे.

यावेळी नगरविकास खात्याचे उपसचिव सतिश मोघे, श्री संत तुकाराम महाराज संस्थान अध्यक्ष मधुकर महाराज मोरे,विश्वस्त माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संजय महाराज मोरे, भानुदास मोरे, मा.सरपंच कांतीलाल काळोखे, रत्नमालाताई करंडे, मधुकर कंद, सचिन कुंभार, शंकरभाऊ काळोखे, अभिमन्यू काळोखे, अभिजित काळोखे, विशाल काळोखे, सचिन काळोखे, राष्ट्रवादी काँग्रेस देहु शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, युवक अध्यक्ष योगेश मोरे, योगेश परंडवाल, विकास कंद, उमेश मोरे, बापू म्हसुडगे व इतर मान्यवर उपस्थित होते.

आमदार शेळके म्हणाले की, अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा हा विषय आज पूर्णत्वास गेला. या कार्यात वारकरी भाविक भक्तांचे व ग्रामस्थांचे श्रद्धास्थान तीर्थक्षेत्र देहुचे स्वतंत्र अस्तित्व कायम रहावे ही जनभावना लक्षात ठेवून या निमित्ताने सर्वांची सेवा करण्याची संधी लाभली, याचा मनस्वी आनंद आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामस्थ आणि वारकरी प्रतिनिधींच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button