breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, येलो अलर्ट

पुणे – पुणे शहर आणि परिसरात शुक्रवारी संध्याकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार पाऊस रस्त्यावरील खड्डे वाहनांच्या लांबच लांब रांगा यामुळे नागरिकांची अक्षरश: दैना उडाली. शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात 18 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील पाच दिवस शहर आणि परिसरात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.

यंदाच्या मोसमात शहरात 1 जून पासून 684.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत शहरात कडक ऊन पडले होते. संध्याकाळी ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली. अर्धा तास झालेल्या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. कोथरूड, कर्वेनगर, पौड रोड, कर्वे रोड, डेक्कन, फर्ग्युसन रस्ता, पुणे विद्यापीठ रस्ता, वारजे, उत्तमनगर, शिवणे यासह अनेक उपनगरांमध्ये पावसानं संध्याकाळी जोरदार हजेरी लावली. कार्यालयातून घरी जाण्याच्या वेळी पावसानं जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.


पुणे विद्यापीठ चौक रोडवरील मोरे विद्यालय चौक, चांदणी चौक, कर्वे रोडवरील नळस्टॉप चौक, कर्वेनगर मधील स्पेन्सर चौक, वडाचा स्टॉप चौक, वारजे परिसरातील जकात नाका परिसर, शिवणे येथील गणपती माथा परिसर या भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती.

पुढील पाच दिवस जोरदार पाऊस

पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने शहरात सध्या रोज पाऊस हजेरी लावत आहे. पुढील पाच दिवस शहर आणि परिसरात जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.

शहरात अलर्ट पाच दिवस मुसळधार
पुणे शहर आणि परिसरात शनिवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे हवामान विभागाने 16 सप्टेंबरपर्यंत शहरात यलो अलर्ट जाहीर केला आहे. 12 ते 16 सप्टेंबर या कालावधीत शहरात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button