breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील चार अधिकाऱ्यांची नियुक्ती

पुणे | कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुण्यात अलिकडेच झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत निर्देश दिले होते.

पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी पुणे महानगरपालिका, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका, पुणे ग्रामीण व छावणी (कॅन्टोंमेंट) या सर्व क्षेत्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात दिले होते. त्यानुसार भारतीय प्रशासकीय सेवेतील चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य सचिव माने यांच्याकडे पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे ग्रामीण व छावणी (कॅन्टोंमेंट) हद्दीतील कोरोना तपासणी करणाऱ्या शासकीय तसेच खाजगी मान्यताप्राप्त लॅबवर नियंत्रण ठेवणे. या लॅबमध्ये कोरोना (कोविड-१९) टेस्टची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे, तसेच या लॅबमध्ये पूर्ण क्षमतेने तपासण्या होतात किंवा नाही याची तपासणी करणे. कोरोना (कोविड-१९) टेस्टचा निर्णय कळण्यासाठी लागणारा कालावधी कमीत कमी करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबतची जबाबदारी देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button