breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुण्यात एसटीच्या शिवशाहीसह ६ खासगी बस जळून खाक

पुण्यात एका गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या एसटीच्या शिवशाहीसह ६ खासगी बसने अचानक पेट घेतला. यामध्ये या सर्व बसेस जळून खाक झाल्या आहेत. या घटनेमागील कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहराजवळील सातारा रोडवरच्या शिंदेवाडीत बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. येथील एका खासगी गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी शिवशाहीच्या २ आणि ४ खाजगी बस उभ्या होत्या.

या आगीच्या झळा गॅरेजमध्ये असणार्‍या इतर ८ गाड्यांना देखील बसल्या आहे. त्यामुळे या गाड्यांचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचे अग्निशामकच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button