breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकूंभ ‘एमआयडीसी’त स्फोट झाल्याची ‘अफवा’

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ एमायडीसीमधील दोन कंपन्यांमध्ये मोठे स्फोट झाले असून, पुणे-सोलापूर महामार्गावरची वाहतूक थांबवली आहे, तसेच परिसरातील नागरिकांना 20 किलोमीटरपर्यंत हलविण्यात आले असल्याची माहिती सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. परंतु, ही निव्वळ अफवा असून नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये, अशी खात्रीशीर माहिती दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस (ता. दौंड) येथील टोल प्लाझानजीकचे ट्राफिक जाम झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात होते. त्यामुळे कुरकुंभ व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या अफवेमुळे कित्येक जणांनी आपल्या नातेवाइकांना संपर्क करत विचारपूसही केली आहे. मात्र, असा कोणताही अपघात औद्योगिक वसाहतींमध्ये झाला नसल्याचे सांगण्यात एमआयडीसीमध्ये काम करणा-या कामगारांकडून सांगण्यात आले.

मात्र, नागरिकांना विनाकारण सोशल मीडियाच्या या अफवेमुळे नाहक त्रासाला बळी पडावे लागले. या माहितीशी खातरजमा करण्यासाठी विचारपूस केली असता ही निव्वळ अफवा असून अशी घटना कुरकूंभ एमआयडीसीमध्ये घडली नसल्याचे पोलीस निरीक्षक महाडीक यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button