breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

दादर भाजी मार्केटमध्ये तुफान गर्दी

मुंबई – राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने या लाटेचा कहर रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकार नागरिकांनाही सातत्याने कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. मात्र अशातच मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये आज सकाळी भाजी घेण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. या गर्दीत काही ग्राहक आणि दुकानदार विनामास्क फिरताना दिसत होते. तसेच याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचाही पुरता फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, राज्यात सध्या 78 हजार 962 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातच वारंवार तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापली काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button