breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे विभागातील 5 लाख 87 हजार 121 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी- विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे |

पुणे विभागातील 5 लाख 87 हजार 121 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 14 हजार 969 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 532 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 311 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.65 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.47 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 4 हजार 948 रुग्णांपैकी 3 लाख 86 हजार 506 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 313 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 129 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.25 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.45 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 58 हजार 422 रुग्णांपैकी 55 हजार 600 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 973 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 849 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 52 हजार 779 रुग्णांपैकी 50 हजार 80 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 866 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 833 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 445 रुग्णांपैकी 46 हजार 552 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 136 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 757 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 370 रुग्णांपैकी 48 हजार 383 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 244 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 743 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 737 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 451, सातारा जिल्ह्यात 137, सोलापूर जिल्ह्यात 99, सांगली जिल्ह्यात 17 तर कोल्हापूर जिल्ह्यात 33 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 997 आहे. पुणे जिल्हयामध्ये 813 , सातारा जिल्हयामध्ये 137, सोलापूर जिल्हयामध्ये 25, सांगली जिल्हयामध्ये 12 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 10 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 40 लाख 24 हजार 711 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 14 हजार 969 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

वाचा- भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध ACB कडून बेहिशोबी संपत्ती प्रकरणी गुन्हा दाखल

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button