breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुणे : येत्या शनिवारी रोजगार मेळावा

पुणे- महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागातर्फे येत्या शनिवारी (दि.16) “बाळासाहेब ठाकरे रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. उरुळी देवाची येथील सोनाई लॉन्स येथे शनिवारी सकाळी दहा वाजता मेळाव्याचे उद्‌घाटन होणार असून यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देसाई यांनी ही माहिती दिली. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते.
तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याच्या उद्योग विभागातर्पेै राज्यभरात रोजगार मेळाव्या घेण्यात येणार आहे. त्याची सुरुवात पुणे जिल्ह्यातून होणार असून येत्या 16 जून रोजी उरळी देवाची येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पालकमंत्री गिरिष बापट, उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील उपस्थित राहणार आहेत, असे देसाई यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाचा कौशल्य विकास विभाग, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, उद्योग संचलानलय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि सीआयआय या उद्योग संघटनांचा या उपक्रमात सहभाग आहे. मेळाव्यात पुणे परिसर आणि जिल्ह्यातील प्रमुख उद्योग, कारखाने, माहिती तंत्रज्ञान, औषध उत्पादक, हॉटेल उद्योग आदी क्षेत्रातील 92 पेक्षा अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत. या मेळाव्यासाठी 8 हजार 800 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरुन नाव नोंदणी केली आहे. यातील चार हजार उमेदवार सर्वसाधारण तर 4 हजार 800 उमेदवार तांत्रीक शिक्षण घेतलेले आहे. तसेच मेळाव्याच्या दिवशीही उमेदवार ऑफलाईन पद्धतीने नावनोंदणी करु शकणार आहे, असे देसाई यांनी सांगितले.

तरुणांना नोकरी मिळावी यासाठी रोजगाव मेळावा घेण्यात आला असला तरी तरुणांनी नोकरी देणारे बनावे, स्वतः उद्योजक बनावे यासाठी स्वयंरोजगार विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे, असे देसाई यांनी सांगितले.

उद्योग विभागातर्फे रोजगार मेळावे घेतले जात आहे. मात्र, या मेळाव्यांमध्ये तरुणांना नोकरी मिळते की नाही, नोकरी मिळविण्यात कोणत्या अडचणी येतात, याचा पाठपुरावा करण्यासाठी उद्योग विभागामर्फत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचेही सुभाष देसाई यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button