breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने कलाटे यांचा सर्वपक्षीय सत्कार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे यांची नियुक्ती झाल्याने सर्वपक्षीय पदाधिकारी आणि विद्यमान नगरसेवकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर कलाटे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे नगरसेवक शत्रुघ्न काटे, राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू मिसाळ, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी यांनी कलाटे यांचा सत्कार केला.

राहूल कलाटे हे शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते आहेत. पक्षाव्यतिरिक्त त्यांचा इतर पक्षाच्या नगरसेवक, पदाधिका-यांशी उल्लेखनिय स्नेह आहे. सर्वच पक्षांतील नगरसेवक किंवा पदाधिकारी यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण नाते आहे. त्यामुळे मनसे, भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष आघाडीच्या नगरसेवकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button