breaking-newsपुणे

पुणे महापालिकेच्या विविध विभागांचे पुरामुळे ५० कोटींच्या पुढे नुकसान

पुणे : शहरात अतिवृष्टीने आलेल्या पुरामुळे जसे खासगी मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तसेच महापालिकेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पथ, मल:निस्सारण, विद्यूत, उद्यान, पाणी पुरवठा, भवन आदी विभागांचे ५० कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. दुरुस्ती करण्यासाठी या सर्व विभागांकडून खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत असून नुकसानीची एकत्रित माहिती गोळा करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुरुवात केली आहे. 


पुरामुळे शहरातील नाल्यांवर आणि मोठ्या ओढ्यांवर असलेले कलव्हर्ट वाहून गेले होते. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून रस्त्यांचे नुकसानही झाले आहे. यासोबतच, जवळपास सहा किलोमीटरच्या मल:निस्सारण वाहिन्या खराब झाल्या आहेत. पाणी पुरवठा विभागाच्या जलवाहिन्या आणि पंपांचेही मोठे नुकसान झाले आहे. पद्मावती पंपिंग स्टेशनमध्येही मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे येथील विद्यूत व्यवस्थाही नादुरुस्त झाली होती. 


यासोबतच उद्यान विभागाच्या अखत्यारीतील कात्रज प्राणी संग्रहालयाची सीमाभिंत पडली होती. या भिंतीचा खर्च दोन कोटींपेक्षा अधिक होणार आहे. यासोबतच नाला उद्याने आणि अन्य उद्यानांचेही पुरामध्ये नुकसान झाले आहे. झाडे, उद्यानांमधील वस्तू, खेळणी पुरामध्ये वाहून गेली. यासोबतच पालिकेच्या मालकीच्या इमारतींच्या सीमाभिंती पडल्या. इमारतींचे नुकसान झाले. स्मशानभूमी, दफनभूमींसह सार्वजनिक इमारतींना पुराचा फटका बसला. अनेक ठिकाणी पुराच्या तडाख्यात विद्यूत खांब उन्मळून पडले. केबल्सचे नुकसान झाले. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे सभागृहामध्ये पाणी शिरल्याने वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली. ती अद्यापही सुरु झालेली नाही. यासोबतच पंखेही बंद पडले होते. विद्यूत विभागाने हे पंखे सुरु केले. परंतू, एसीच्या दुरुस्तीला मोठा खर्च येणार असल्याने त्याचे काम रखडले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button