breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

समीर वानखेडेंनी शाहरुखकडे २५ कोटी मागितले? सीबीआयचा गंभीर आरोप!

मुंबई : बॉलीवुड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक करणारे आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याच घरावर सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने आता एफआयआरमध्ये मोठा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खआन क्रूझ ड्रग्स प्रकरणी समीर वानखेडे आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. साक्षीदार के. पी. गोसावी याने आर्यन खानच्या कथित ड्रग्स प्रकरणात आर्यन खानच्या कुटुंबाकडून २५ कोटी उकळण्याची योजना आखली होती, असा खुलासा साबीआयने केला आहे.

हेही वाचा – WTC Final 2023 : ICC ने क्रिकेटमधील ‘हा’ विवादित नियम केला रद्द

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्जप्रकरणी साबीआयकडून कारवाई करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयकडून समीर वानखेडे यांच्याशी संलग्न असलेल्या मुंबई, दिल्ली, रांची, कानपूरसह २९ ठिकाणांवरील मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button