breaking-newsपुणे

वैद्यकीय योजनेचा भार पीएमपीला पेलवेना

  • सुमारे सात कोटी थकले
  • काही महिन्यांपासून प्रत्यक्षात खर्च व पीएमपीकडे जमा होणारा निधी यामध्ये मोठी तफावत

पुणे : कर्मचाऱ्यांनी सवलतीमध्ये वैद्यकीय उपचार व्हावेत या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या अंशदायी वैद्यकीय योजनेचा भार पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ला पेलवेनासा झाला आहे. आतापर्यंत विविध रुग्णालयांची सुमारे ७ कोटी रुपयांची देणी थकल्याने कर्मचाऱ्यांना उपचारामध्ये अडथळे येऊ लागले आहेत. रुग्णालयांकडून सवलतीत उपचार नाकारले जात असल्याचे प्रकार घडू लागल्याचा दावा कर्मचाºयांकडून केला जात आहे. 


मागील काही महिन्यांपासून प्रत्यक्षात खर्च व पीएमपीकडे जमा होणारा निधी यामध्ये मोठी तफावत पडू लागली आहे. याचा फटका थेट कर्मचाऱ्यांना बसत आहे. काही दिवसांपुर्वी पीएमपी कर्मचारी आदेश चव्हाण यांचे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरूवातीला त्यांनी योजनेचा कार्ड दाखविल्यानंतर उपचार सुरू  करण्यात आली. पण दोन दिवसांनंतर रुग्णालयाने त्यांना ४० हजार रुपयांचे बील दिले. चव्हाण यांनी १० टक्के रक्कम भरतो असे सांगितले. पण रुग्णालयाने संपुर्ण खर्च मागितला. हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत गेल्यानंतर त्यांच्याकडून केवळ १० टक्के खर्च घेण्यात आला. पण असाच त्रास इतर कर्मचाऱ्यांनाही होत असल्याच्या तक्रारी आहेत. योजनेतील खर्चाची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने रुग्णालयांकडून अंग काढून घेतले जात आहे. काही रुग्णालये कर्मचाºयांकडेच सर्व खर्च मागत आहेत. त्यामुळे कर्मचाºयांसमोर उपचारासाठी अडचणी निर्माण होत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button