breaking-newsपुणेमुंबई

पुणे पोलिसांची तत्परता,पैशांनी भरलेली प्रवाशाला त्याची बॅग केली परत

दिवाळी निमित्त गावी जात असताना निलेश मारुती साळुंखे हे एका प्रवासी वाहनामध्ये तब्बल ७० हजार रुपयाची रोख रक्कम विसरले होते. परंतु वाकड पोलिसांनी तत्परता दाखवत अनोळखी वाहनचालक आणि वाहन शोधून काढले आणि सीसीटीव्हीच्या मदतीने मूळ मालकाला त्याची अमानत परत केली. निलेश मारुती साळुंखे अस तक्रारदार प्रवाशाचे नाव असून ते मुंबईत बोरीवली येथे राहतात. निलेश हे दिवाळीनिमित्त सातारा या मूळ गावी जात होते. तेव्हा ही घटना त्यांच्यासोबत घडली. पैसे परत मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

सविस्तर माहिती अशी की, निलेश हे दिवाळीनिमित्त त्यांच्या मूळ गावी सातारा येथे निघाले होते. त्यांच्या सोबत असलेल्या एका बॅगेत ७० हजार रुपयांची रोख रक्कम होती. मुंबई येथून ते मोटारीत बसले. सोबत असलेली बॅग त्यांनी मोटारीच्या डिक्कीत ठेवली होती. सायंकाळच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमधील भूमकर चौक येथे मोटारीतून उतरले. घाईत ते बॅग घ्यायची विसरून गेले. परंतु, काही वेळानंतर पैसे असलेली बॅग मोटारीच्या डिक्कीत विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले.

तातडीने वाकड पोलिसात जाऊन संबंधित घटनेची तक्रार दिली. निलेश यांना प्रवाशी मोटारीचा क्रमांक माहीत नव्हता. त्यामुळे प्रवाशी मोटार शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी एक पथक तयार केले.

ज्या ठिकाणी निलेश प्रवाशी वाहनातून उतरले होते तिथे कसून चौकशी करण्यात आली. परिसरात असलेले सीसीटीव्ही तपासण्यात आले. तेव्हा, निलेश हे एका मोटारीतून उतरल्याचे दिसले, त्याच मोटारीत पैसे असलेली बॅग असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तातडीने वाहनचालक दिनेश कसबे रा.सुसगाव पुणे याच्याकडे जाऊन त्याच्या मोटारीच्या डिक्कीत रोख रक्कम ७० हजार रुपये असलेली बॅग मिळाली.

मूळ मालक निलेश यांना संबंधित रक्कम वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांच्या हस्ते परत करण्यात आली. सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस उपनिरीक्षक बाबर, पोलीस कर्मचारी सचिन नरुटे, विक्रम कुदळे, सूरज सुतार, प्रशांत गिलबिले यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button