breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणेकरांच्या पाण्यासाठी शिवसेना रस्त्यावर, महापालिकेसमोर मटका फोड आंदोलन

पुणे |महाईन्यूज|

पुणेकरांना पाणी मिळत नसल्याने शिवसेना पाण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. धरणे भरली तरीही नागरिकांना पाणी मिळत नाही, त्यामुळे शिवसेनेने मटका फोड आंदोलन केले.

पुणेकरांना पाणीपुरवठा करण्यात सत्ताधारी भाजप अपयशी ठरल्याचा ठपकाही आंदोलनकर्त्यांनी ठेवला. परिणामी, या आंदोलनाचा रोष सत्ताधारीच होते. पुणे शहराला पाणीपुरठा करणाऱ्या चारही धरणांत शंभर टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पुणेकरांना रोज पुरेसे पाणी मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून काही भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

शिवाजीनगर परिसरातील रहिवाशांना अपुरे आणि अवेळी पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. याआधी आपटे रस्ता, पोलिस वसाहत, शिरोळे वसाहतील महिलांनी पाण्यासाठी आंदोलने केली. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन देऊनही तो झाला नसल्याने सोमवारी पुन्हा रहिवाशांनी थेट महापालिका गाठून आंदोलन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button