breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुढील 3 ते 4 तास मराठवाडा, विदर्भ आणि घाट परिसरात विजांंच्या कडकडाटात पावसाची शक्यता

पुढील तीन ते चार तास दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा , विदर्भ आणि घाट प्रदेशात विजांंच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर यांंनी दिली आहे.

मुंंबई आणि गोवा येथील रडारवरील रेकॉर्ड झालेली दृश्य शेअर करत होसाळीकर यांंनी आजच्या संंध्याकाळसाठीचे पावसाचे अंदाज वर्तवले आहेत. या भागात आता सुद्धा ढगांंचा गडगडाट आणि विजांंचे आवाज ऐकु येत आहेत. दुसरीकडे मुंंबई, पुणे , कोकण , ठाणे , रायगड परिसर हे कालपासुन शांंत आहेत, या भागात पावसाने विश्रांंती घेतली असुन काल मुंंबई उपनगरात काही हलक्या सरी बरसल्या होत्या मात्र त्यानंंतर आज पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याचे पहायला मिळालं .

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, 6 सप्टेंबर पासून पावसाचा जोर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांत वाढण्याची शक्यता होती. तर मुंबईत कोरडे वातावरण अनुभवायला मिळेल असे सांंगण्यात आले होते. हे अंदाज खरे ठरत आहेत व पुढील काही दिवस हिच परिस्थिती कायम राहण्याची सुद्धा शक्यता आहे.

दरम्यान, राज्यातील बदलत्या वातावरणामुळे तब्येतीची काळजी घेण्याची खास गरज आहे. अगोदरच कोरोनाचे सावट असताना स्वास्थ्य टिकवुन ठेवण्यासाठी पाणी उकळुन पिणे, जेवणात संयम ठेवणे तसेच कोरोना संबंधित नियम म्हणजे हात धुणे, सर्दी खोकला असल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे याचे पालन करावे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button