breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

पुजाराची नऊ तास झाेप, घरकामात पत्नीला मदत

राजकोट | लॉकडाऊन नसते तर चेतेश्वर पुजारा ग्लूस्टरशायरकडून काउंटी खेळत असता. मात्र, आता लाॅकडाऊनमुळे दोन वर्षीय मुलगी आदितीसोबत वेळ घालवतोय. त्यासह ९ तास झोप घेतोय. तो पत्नी पूजाला घरकामात देखील मदत करतो.

‘सध्या मी ९ तासांपेक्षा अधिक झोपू शकत नाही, कारण माझी मुलगी आदिती ७.३० वाजता उठते. तिला दिवसभर खेळायला आवडते. माझ्या घराच्या मागे गार्डन आहे, तेथे आम्ही सोबत खेळतो. तिला माझ्या सोबत बागकाम करायला आवडते. मी घरच्या कामात पूजाची मदत देखील करतो. स्वच्छतेबरोबर मी भांडे देखील धुवत आहे. खाद्यपदार्थ मला चांगले बनवता येत नाही. मला वाटते, प्रत्येकाने घरच्या कामात मदत केली पाहिजे.

मला कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडते. खेळाडू म्हणून आमच्याकडे कुटुंब व मित्रांना देण्यासाठी अधिक वेळ नसतो. आता आम्हाला संधी मिळाली आहे. सध्या मला क्रिकेेटसह बॅडमिंटनची खूप आठवण येतेय. मी जेव्हा राजकोटमध्ये घरी असतो, तेव्हा आठवड्याला जयदेव उनादकट सोबत बॅडमिंटन खेळण्यासाठी जातो. मला बॅडमिंटन खूप आवडते. पूजा बॅडमिंटन शिकवते, मात्र मी तिला जिंकू देत नाही. मी पराभूत झाल्यावर तिला आनंद वाटतो, त्यासाठी मी पराभूत व्हावं, असे होऊ शकत नाही.’ सोशल मीडियाबाबत पुजाराने म्हटले की, “मी सोशल मीडियावर अधिक वेळ घालवत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button