breaking-newsमनोरंजन

पी.व्ही. सिंधुच्या बायोपिकसाठी पहिली पसंती दीपिकाला

सध्या बायोइकच्या सिनेमांचे उदंड पीक यायला लागले आहे. यामध्ये ऍक्‍टर, सिंगर, खेळाडू या सगळ्यांचेच बायोपिक एकापाठोपाठ एक करून यायला लागले आहेत. यामध्येच आता ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचाही बायोपिक आगामी काळामध्ये येण्याची शक्‍यता आहे. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. अजून या बायोपिकची तयारी सुरू झालेली नाही. अद्याप याची केवळ चर्चाच होते आहे. ऍक्‍टर प्रोड्युसर सोनू सूद हा सिनेमा करणार आहे, असे समजते आहे. मेरी कोमच्या बायोपिकमध्ये प्रियांका चोप्रा होती.

साईनाच्या बायोपिकसाठी श्रद्धा कपूर लीड रोलमध्ये आहे. आता सिंधूच्या रोलला योग्य न्याय देऊ शकेल, अशा ऍक्‍ट्रेसचा शोध सध्या सुरू आहे. सिंधूच्या रोलसाठी दीपिका पदुकोणच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. सिंधू आणि दीपिकाच्या दिसण्यामध्ये बरेच साम्य आहे आणि ती सिंधूचा रोल योग्यप्रकारे साकारेल असा निर्मात्यांनाही विश्‍वास वाटतो आहे. सिंधूनेही त्याला दुजोरा दिला आहे. दीपिका बॅडमिंटनही उत्तम खेळते. सरते शेवटी ती बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोणचीच कन्या आहे. हिंदी आणि तमिळ अशा दोन्ही भाषात बनणाऱ्या या सिनेमाचे शुटिंग या वर्षाच्या अखेरीस सुरू होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button