पिझ्झा डिलीव्हरी बॉयकडून ‘या’ अभिनेत्रीचा नंबर अडल्ट ग्रुपवर शेअर
तामिळ चित्रपटातील अभिनेत्री गायत्री सईने एका पिझ्झा डिलीव्हरी बॉयच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. घरी पिझ्झा डिलीव्हरी करण्यास आलेल्या मुलाने माझा फोन नंबर व्हॉट्सअपच्या एका अडल्ट ग्रुपमध्ये शेअर केला, असा आरोप अभिनेत्री गायत्री सईने केला आहे. याबाबत तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट केली.
गायत्री सईने ट्विटरवर याबाबत एक पोस्ट केली आहे. या पोस्ट सोबत तिने पिझ्झा डिलीव्हरी करणाऱ्या त्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. “डॉमिनोज इंडिया या पिझ्झा कंपनीचा पिझ्झा डिलीव्हरी करणाऱ्या एका मुलाने 9 फेब्रुवारीला माझ्या चेन्नईच्या घरी पिझ्झा दिला. त्यावेळी तो मुलगा नशेत होता. त्याने माझा फोन नंबर एका अडल्ट ग्रुपमध्ये शेअर केला.”
याबाबत तिने तक्रार दाखल केल्यानंतर तिला डॉमिनॉजच्या कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही,” असा आरोप त्या अभिनेत्रीने केला आहे.