breaking-newsपिंपरी / चिंचवड

दिव्यांगावर लाठीचार्ज, दोषी पोलीस कर्मचा-याला त्वरित निंलबित करा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मनाला चटका लावून जाणारी घटना नुकतीच पुण्यात घडली संविधानिक अधिकारांसाठी आंदोलन करणा-या दिव्यांग आंदोलकांवर पोलिसांकडून अमानुष लाठीहल्ला व मारहाण करण्यात आली. पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसने याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले.

युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, दिव्यांग व दुर्बलांना समाजातून सौम्य आधाराची गरज असते. एक सुसंस्कृत समाजाच्या नात्याने हे मानवतेचे कर्तव्य बजावले पाहीजे. मात्र, या प्रकारात घेतलेली कठोर व आक्रमक भूमिका पाहता, पोलिस दलाच्या कार्यपध्दतीबाबत नागरिकांच्या मनांत प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित दोषींना निलंबित करावे, अशी मागणी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष बनसोडे यांनी केली आहे. युवक काँग्रेस शिष्टमंडळात पिपंरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, अनिल सोनकांबळे व शहाबाज सिकिलगार यावेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button