breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सव्वालाखाचा गुटखा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – गुटखा पान मसाला विक्री करणा-या एकाला पिंपळे गुरव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे मालाचे गोडाऊन तपासले असता एक लाख 26 हजार 176 रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला. अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई मंगळवारी (दि. 20) केली आहे.

याप्रकरणी छोगाराम पेमाराम चौधरी (वय 34, रा. श्रृष्टी अपार्टमेंट, श्रृष्टी चौक, पिंपळे गुरव) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वसंत मुळे आपल्या पोलीस सहका-यांसह पिंपळे गुरव परिसरात मंगळवारी पेट्रोलींग करत होते. अशोक नगर येथील पोस्ट ऑफिसच्या पाठीमागे छोगाराम संशयीतरित्या दिसून आल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर आपण गुटखा पान मसाला विक्री करत असल्याचे त्याने सांगितले. त्यावर त्याचे मालाचे गोडाऊन तपासले असता विमल, आरएमडी, गोवा असा एकूण एक लाख 26 हजार 176 रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button