breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमधील मेफेयर मॉलमध्ये गोळीबार, 8 जखमी; हल्लेखोर फरार

नवी दिल्ली: अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यात मॉलमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी मेफेयर मॉलमध्ये झालेल्या दुर्घटनेत किमान 8 जण जखमी झाले आहेत. हल्लेखोरांच्या शोधात पोलिस शोध मोहीम राबवित आहेत. गोळीबारानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर घेरला आहे. या घटनेमुळे संपूर्ण विस्कॉन्सिन राज्यात खळबळ उडालेली आहे. न्यूज एजन्सी एएफपीने स्थानिक प्रशासनाच्या हवाल्याने सांगितले की, विस्कॉन्सिनच्या ववातोसा येथील मॉलमध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने घटनास्थळावरून पळून काढलेला आहे.

आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तसेच हल्ल्यामागील नेमके कारणदेखील समजू शकलेले नाही. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) आणि मिलवॉकी काउंटी शेरीफच्या कार्यालयाने केलेल्या ट्विटनुसार, अधिकारी आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. ववातोसा पोलिसांनी सांगितले की, मॉलमध्ये झालेल्या गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झालेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button