breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे गुरवच्या उद्यानात राजमाता जिजाऊचा पूर्णाकृती पूतळा उभारा

– पिंपळे गुरवमधील नागरिकांची मागणी
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपळे गुरव येथे राजमाता जिजाऊ उद्यानात कोटयावधी रूपये खर्च होत आहेत. उद्यानाचे आधुनिकीकरण व नुतनीकरनाचे काम सुरु आहे. उद्यानाला राजमाता जिजाऊ असे नाव असताना उद्यानात राजमाता जिजाऊंचा पूर्णाकृती पुतळा नाही. या उद्यानाला नागरिक डायनोसर उद्यान म्हणून संबोधले जाते. त्या उद्यानात पालिकेने राजमाता जिजाऊंचा पुर्णाकृती पुतळा उभारला. त्यामुळे  पिंपरी – चिंचवडच्या नावलौकिकात भर पडेल, अशी मागणी पिंपळे गुरवमधील नागरिकांनी केली आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांना निवेदन देण्यात आले. यावेळी, आन्ना जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे ,कार्याध्यक्ष, गजानन धारशिवकर ,युवक शहर अध्यक्ष, अतिश गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष ,नियाज शेख ,बदाम काबळे,गोरखनाथ वाघमारे आळंदी शहराध्यक्ष रवी भेंनकी,अक्षय जगदाळे, निलेश जगदाळे, प्रकाश अत्रे,अशोक जाधव, कार्तिक जगदाळे, अशूतोष जगदाळे ,श्रीनिवास पानसरे ,वाघमारे, सा.का.किसन फसके,संदीप गायकवाड, पि.पी पिल्ले,बंडेवार प्रकाश,,वसंत मांढे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हिंदवी स्वराज्याची संकल्पना साकारणाऱ्या शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, सर्व धर्माना समान वागणूक हे पंचतत्व गुणांचे बाळकडू देणाऱ्या जिजाऊंचा पुर्णाकृती भव्य पुतळा व्हावा, जेणेकरून उद्यानात आलेल्या नागरिकांना त्यांचा आदर्श डोळ्यासमोर राहून प्रेरणा मिळेल, त्यांच्या प्रेरणेतुन स्वराज्य निर्माण झाले, स्त्रियांना प्रोत्साहित करणाऱ्या राजमातेचा भव्य पुर्णाकृती पुतळा प्रेरणास्त्रोत ठरेल, यात शंकाच नाही.
याबाबत नागरिकांच्या भावनाचा विचार करून पुर्णाकृती पुतळा उभारावा, असे आवाहन मानवी हक्क  संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सर्व पदाधिकारी घेवून आमदार लक्ष्मण जगताप यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आमदार जगताप यांनी आम्हाला  काम चालू आहे, तोपर्यंत आपण योग्य सुचना करा. त्याचा ही विचार करु असे आश्वासन दिले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button