breaking-newsआंतरराष्टीय

जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार, कुलगाम जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद

जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. कुलगाम जिल्ह्यातील ताझीपोरा गावात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रीय रायफल्स, राज्य पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) परिसराला घेराव घालत सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं.

‘मंगळवारी संध्याकाळी उशिरा आम्ही सर्च ऑपरेशनला सुरुवात केली होतं. दहशतवादी लपले होते त्या घराजवळ सुरक्षा दल पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला ज्यानंतर चकमक सुरु झाली’, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. अजून काही दहशतवादी लपले असून त्यांच्यासोबत चकमक सुरु आहे.

दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव कुलगाम जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यादरम्यान जम्मूमध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. लष्कर तळाचे फोटो आणि व्हिडीओ काढत असल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. दोघांना पोलिसांकडे सोपवण्यात आलं असून चौकशी सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button